
नमस्कार! आम्ही लीला आणि गोपू
आम्ही अशा करतो कि तुम्ही लायगो च्या आमच्या प्रवासासंबंधी प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा आनंद घेत असाल. विज्ञानाप्रती आमच्या अविरत प्रेमाची तुम्हाला ओळख करून देण्यासाठी गोष्टींच्या ह्या अभूतपूर्व प्रवासात आम्ही तुमचे सोबती होऊ इच्छितो!
गुरुत्वाकर्षण लहरींच्या शोधांमध्ये तुमच्या योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही काही पर्यायांची यादी आम्ही इथे उपलब्ध करून देत आहोत.
यापैकी बरेचसे मजेशीर ज्ञानवर्धक उपक्रम तुम्ही घरी तुमची कुटुंबासोबत अथवा एकट्यानेही राबवू शकता! तुम्ही ह्या उपक्रमांमार्फत गुरुत्वाकर्षण लहरींचा शोध लावू शकता, ह्या लहरी टिपणाऱ्या निरीक्षक उपकरणांची रचना करू शकता तसेच आभासी (virtual वर्चुअल) पद्धतीने ह्या उपकरणांना कार्यरत ठेवू शकता, इतकेच नाही, इतरही बऱ्याचश्या नावीन्यपूर्ण गोष्टी शिकू शकता:
Gravity Spy – ग्रॅव्हिटी स्पाय (गुरुत्वाकर्षण लहरींचा गुप्तचर)- अगदी आजपासूनच लायगो शास्त्रज्ञांना गुरुत्वाकर्षण लहरी शोधण्यात मदत करा! (Zooniverse झूनीव्हर्स चा उपक्रम)
Space-time Quest – स्पेस टाईम क्वेस्ट (अवकाश आणि काळाची शोधाशोध)– हुशारीने निधी आणि संसाधनाची काटकसर करून गुरुत्वाकर्षण लहरी टिपणाऱ्या तुमच्या पसंतीच्या निरीक्षक उपकरणाची रचना करा. हा खेळ इंग्रजी, स्पॅनिश, कॅटलान, डच, जर्मन, चिनी, फ्रेंच, इटालियन, रशियन, जपानी, हिंदी आणि ब्राझिलियन पोर्तुगी इत्यादी विभिन्न भाषांमध्ये खेळला जाऊ शकतो! (बर्मिंगहॅम विद्यापीठातील इन्स्टिटयूट फॉर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह च्या सौजन्याने)
Black hole Hunter – ब्लॅकहोल हंटर (कृष्णविवरांचा वेध)– गुरुत्वाकर्षण लहरींचा शोध घेण्यासाठीचा मजेशीर उपक्रम! इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हंगेरीअन, इटालियन, जपानी, पोलिश, रोमानियन, स्पॅनिश आणि वेल्श भाषांमध्ये उपलब्ध! (कार्डिफ विद्यापीठाच्या ग्रॅव्हिटी एक्सप्लोरेशन इन्स्टिटयूट च्या सौजन्याने)
Black Hole Master – ब्लॅकहोल मास्टर (कृष्णविवरांचा स्वामी)– दोन खेळाडूंच्या ह्या खेळात तुमच्या कृष्णविवराच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून मार्गात येणाऱ्या ताऱ्यांना आपल्या विरोधकाच्या कृष्णविवराच्या कक्षेत ढकला आणि गुण मिळवा! (बर्मिंगहॅम विद्यापीठातील इन्स्टिटयूट फॉर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह च्या सौजन्याने)
अधिक माहिती व अभ्यासोपयोगी पर्यायांसाठी लायगोच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. येथे तुम्ही विभिन्न प्रकारच्या उपक्रमात सहभागी होऊ शकता. उदाहरणार्थ शाळेत/ वर्गात राबवायचे उपक्रम , लायगो वैज्ञानिकांशी संवाद: अश्या प्रकारे तुम्ही लायगो आपल्या शाळेत समाविष्ट करून घेऊ शकता! इथे तुम्हाला अतिरिक्त वैज्ञानिक माहिती, विडिओ तथा जवळच्या काळात टिपण्यात आलेल्या गुरुत्वाकर्षण लहरींची
“Aim this stone at the brightest star!..Can you see the ripples in the water? That’s how things in space talk!”
Lila
